[satara] - अचानक गावठी बॉम्बचा स्‍फोट . यात एक मजूर गंभीर जखमी

  |   Sataranews

गावठी बॉम्बचा स्‍फोट

सातारा

वडाचे म्हसवे येथील जंगलात बंधाऱ्याचे काम करीत असताना अचानक गावठी बॉम्बचा स्‍फोट झाला. यात एक मजूर गंभीर जखमी झाला. दादासो शामराव चव्हाण, असे जखमी मजुराचे नाव आहे. त्‍यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास सर्व मजूर बंधाऱ्यावर काम करीत असताना अचानक दगडाखाली गावठी बॉम्बचा स्फोट झाला. त्‍यामुळे चव्हाण गंभीर जखमी झाले. हा बॉम्‍ब या ठिकाणी कोणी आणि का आणला होता. या बाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. जंगल परिसरात आणखी असे गावठी बॉम्‍ब असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, या प्रकरणी कसून चौकशी व्हावी, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे. दरम्यान, वन्यप्राणी आणि रानडुकरे मारण्यासाठी दगडांमध्ये गावठी बॉम्ब सदृश वस्तू ठेवण्यात असल्याची माहिती, मेढा पोलिसांनी घटनास्थळावरून दिली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/hBglZAAA

📲 Get Satara News on Whatsapp 💬