[satara] - उदयनराजे ‘छत्रपती’ म्हणून लढल्यासबिनविरोध विजयी करू

  |   Sataranews

उदयनराजे 'छत्रपती' म्हणून लढल्यास

बिनविरोध विजयी करू

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भूमिका

म. टा. वृत्तसेवा, सातारा

'आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना व भाजपा युतीचा निर्णय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे घेतील. मात्र, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्ष वाढीसाठी ताकदीने झोकून देऊन काम करावे लागेल. खासदार उदयनराजे भोसले 'छत्रपती' म्हणून लढले तर साताऱ्यांची जागा बिनविरोध करू. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढले तर शिवसेना त्यांच्या विरोधात लढणारच,' असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

सातारा येथील सरकारी विश्रामगृहावर शिवसेनेच्या सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख व उपजिल्हा प्रमुखांची बैठक दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी शिवसेनेचे उपनेते व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील, हर्षल कदम, कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार, रणजितसिंह भोसले, प्रताप जाधव प्रमुख उपस्थित होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ot00qwAA

📲 Get Satara News on Whatsapp 💬