[solapur] - अंगणवाडी सेविकांचा थाळीनाद

  |   Solapurnews

अंगणवाडी सेविकांचा थाळीनाद

सोलापूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोषण अभियानात केलेली १५०० रुपयांची मानधनवाढ तातडीने देण्याबरोबरच इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेवर विराट मोर्चा काढून थाळीनाद केला. ताटल्यांच्या कडकडाटाने जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला होता. अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य उपाध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना वेतनश्रेणी देण्याची जुनी मागणी असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१८मध्ये झालेल्या पूरक पोषण आहार अभियान कार्यक्रमात पंधराशे रुपयांची तुटपुंजी मानधनवाढ जाहीर केली. ही वाढ ऑक्टोंबर २०१८ पासूनच लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र चार महिने उलटले तरीही याची अंमलबजावणी झालेली नाही. केवळ घोषणा करून सरकारने तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली आहे, असा सूर्यमानी गायकवाड यांनी केला. दरम्यान, सोमवारी सकाळी चार हुतात्मा पुतळा येथे शहर आणि जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस लाल साड्या परिधान करून आणि थाळी व चमचे घेऊन हजारोच्या संख्येने जमा झाल्या होत्या. मोर्चाद्वारे त्या जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ गेल्या आणि त्या ठिकाणी थाळीनाद आंदोलन करून त्यांनी परिसर दणाणून सोडला.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/msoGpAAA

📲 Get Solapur News on Whatsapp 💬