[solapur] - पंढरपूरः विठूरायाच्या दागिन्यांचे होणार लेखपरीक्षण

  |   Solapurnews

विठूरायाच्या खजिन्यात शेकडो वर्षांपासून दान करण्यात आलेल्या आणि अब्जावधी किमतीच्या दागिन्यांचे लेख परीक्षण करण्याचा निर्णय सोमवारी मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सर्व दागिने चिरकाल टिकण्यासाठी त्यांच्यावर खास पद्धतीची प्रक्रिया केली जाणार आहे. मंदिर समितीच्या बैठकीत सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नियुक्त करण्यात आली असून, येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण केले जाणार आहे.

देवाच्या खजिन्यात शेकडो वर्षांपासून अतिशय मौल्यवान पारंपरिक दागिन्यांचा समावेश आहे. या सर्व अनमोल दागिन्यांच्या योग्य पद्धतीने नोंदी आणि लेखा परीक्षणाचे काम आजवर झाले नसल्याने हे काम तातडीने हाती घेतले जाणार आहे. पुरातन दागिन्यांचे अभ्यासक आणि इतर संस्थांची मदत घेऊन या दागिन्यांचे डिजिटलायझेशन केले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक अनमोल दागिन्यांचा इतिहास, रचना, त्यातील हिरे, माणिक मोत्यांच्या विवरणासह फोटोसह मंदिराकडे उपलब्ध होणार आहे....

फोटो - http://v.duta.us/ZK5wrwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/gOnelQAA

📲 Get Solapur News on Whatsapp 💬