[solapur] - विठुरायाला अर्पण केलेल्या सोने-चांदीच्या होणार विटा

  |   Solapurnews

पंढरपूर: भक्तांकडून अर्पण करण्यात आलेल्या सोने चांदीचे दागिने वितळवून त्याच्या विटा करण्यात येणार आहेत. मंदिर समितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय विठुरायाच्या खजिन्यात शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या आणि अब्जावधी किंमतीच्या दागिन्यांचे लेख परीक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे सर्व दागिने चिरकाल टिकण्यासाठी त्यांचेवर खास प्रक्रिया केली जाणार आहे. आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नियुक्त करण्यात आली असून येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण केले जाणार आहे.

भक्ताकडून आलेली प्रत्येक सोने चांदीच्या भेट वस्तुंची मंदिर समितीकडून नोंद करुन खजिन्यात जमा करण्यात येत असे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या हजारो वस्तू सांभाळणे मंदिर समितीसाठी जिकिरीचे बनू लागले आहे. देवाच्या खजिन्यात भेट आलेल्या सोन्याच्या २५ किलो आणि चांदीच्या ८३० किलो वस्तू आता रिझर्व्ह बँकेच्या गोल्ड रिफायनरीमध्ये वितळवून त्याच्या विटा बनविण्यात येणार आहेत. यामुळे मंदिर समितीची डोकेदुखी कमी होणार असून याच्या व्याजातून मंदिराला चांगले उत्पन्न देखील मिळण्यास सुरुवात होणार आहे....

फोटो - http://v.duta.us/jE-jRAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/TEEXIwAA

📲 Get Solapur News on Whatsapp 💬