[thane] - पालिकेत रंगले ‘सूर नक्षत्राचे’

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, कल्याण

गदिमा आणि बाबूजी या द्वयींच्या साथीमुळे अजरामर झालेल्या कौसल्येचा रामबाई, चौदवी का चांद हो, घननीळा लडीवाळा यांसारख्या एकापेक्षा एक सुंदर गीतांचा अनोखा नजराणा कल्याणकरांना अनुभवता आला. निमित्त होते, कल्याण-डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित माघी गणेशोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या सूर नक्षत्राचे कार्यक्रमाचे. स्वरदा सोमण, अनिता जोशी आणि वैभव गायकवाड या तिघांच्या जादुई आवाजातील हिंदी, मराठी गाण्याची संगीत मैफल उत्तरोत्तर बहरत गेली.

दरवर्षीप्रमाणे कल्याण-डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने पालिकेच्या आवारात माघी गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या गणेशोत्सवानिमित्त सूर नक्षत्राचे या सुंदर मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवाने मैफलीची सुरुवात झाली. यानंतर उंबरठा चित्रपटातील गगन सदन तेजोमय, या स्वरदा सोमण यांच्या गीताने रंगत आणली. अनिता जोशी यांच्या आवाजातील कौसल्येचा राम या गीताला रसिकांनी भरभरून दाद दिली. या गायकांना तबलावादक सूरज सोमण, ढोलक पड जयंत सदरे, कीबोर्ड प्रमोद ढोरे यांची साथ मिळाली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/2TlNwAAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬