[thane] - विकासकामांऐवजी गावे भकास विकासाच्या गमजा मारत राज्यातील यु

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, पालघर

विकासाच्या बाता मारत शिवसेना आमदार रवींद्र पाठक आणि भाजपच्या राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी दत्तक घेतलेल्या अनुक्रमे मासवण आणि नांदगाव तर्फे मनोर गावांत काहीही विकासकामे झालेली नाहीत. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी असून लोक गावांचा उल्लेख 'भकास गावे' म्हणून करत आहेत.

पालघर जिल्ह्यातील मासवण ग्रामपंचायत सेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी २०१७ला दत्तक घेतले आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या गावात कोणतेही काम न केल्याने तेथील ग्रामस्थांची त्यांच्यावर प्रचंड नाराजी आहे. विकासाचे गाजर दाखवत मोठा गाजावाजा करणारे हे आमदार आगामी निवडणुकीत मतदारांना काय उत्तर देणार असा सवाल विचारला जात आहे.

पालघर जिल्ह्यातील नांदगाव तर्फे मनोर गाव मुंबई गोरेगावच्या आमदार व महिला बालकल्याण विभागाच्या राज्य मंत्री विद्या ठाकूर यांनी २०१६ला दत्तक घेतले होते. या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत उपस्थिन राहून शेकडो लोकांच्या समक्ष रस्ते, आरोग्य, शिक्षण, वीज तसेच कातकरी वस्ती सुधारणे, समाज मंदिर, शाळेची इमारत अशी अनेक कामे करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात काहीही काम झालेले नाही....

फोटो - http://v.duta.us/Tu6VSAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/zRKklAAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬