[thane] - ‘५९ मिनिटांत कर्ज’ योजनेचे ९७० लाभार्थी

  |   Thanenews

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

यांनी सुरू केलेल्या ५९ मिनिटांत कर्ज योजनेत शंभर दिवसांमध्ये ९७० व्यक्तींना मंजुरी मिळाली असून ४३० व्यक्तींना कर्ज वितरित करण्यात आले आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अर्थात एमएसएमई क्षेत्रासाठी सुरू असलेल्या या योजनेतील उद्योगांसाठी ही योजना असून ५९ मिनिटांच्या कर्जासाठी विशेष पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे हे वितरण झाल्याची माहिती ठाणे जिल्ह्यातील लीड बँकेचे व्यवस्थापक जे. एन. भारती यांनी दिली. भिवंडीमध्ये आयोजित एमएसएमई समन्वय कार्यक्रमाच्या उद्घाटनादरम्यान त्यांनी ही माहिती दिली. यावेळी भिवंडीचे खासदार कपिल पाटील आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयाच्या नवी मुंबईतील विभागीय कार्यालयाच्यावतीने भिवंडीमध्ये कापड क्षेत्रातील एमएमसएमईच्या समन्वय तयार करण्यासाठी १०० दिवसांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी, ९ फेब्रुवारी रोजी पर पडले. यावेळी वस्त्रआयुक्त एस. पी. शर्मा, आरओटीएक्ससी उपसंचालक शिवकुमार एस. लीड बँकेचे जिल्हा व्यवस्थापक जे. एन. भारती यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वस्त्रोद्योग विभागातर्फे देशभरातील आठ जिल्ह्यांमध्ये एमएसएमई कॅम्पेन राबविण्यात आले. या निमित्ताने भिवंडीत पॉवर लूम उत्पादनाचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये २६ प्रदर्शक उपस्थित राहून ४०० हून अधिक व्यापारी आणि खरेदीदारांनी या प्रदर्शनाला भेट दिली. समूह विम्याच्या सोशल सिक्युरीटी योजनेअंतर्गत १०९ विणकरांची नोंदणी करण्यात आली आहे. ६४ एमएसएमईच्या उद्योजकांना टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड उपलब्ध करण्यात आला आहे. यासाठी ७.१३ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. ४९ कोटी रुपयांची एकूण गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या १३ नव्या प्रयोगांची सुरुवात करण्यात आली आहे. ११ कोटी रुपयांच्या कर्जाचा फायदा घेण्यासाठी मुद्रा लोनअंतर्गत नवीन अर्ज मिळाले आहेत. पॉवरटेक्स इंडिया स्कीममध्ये पॉवरलूम सेक्टर विकासाची व्यापक योजनाही तयार करण्यात आली आहे, अशी सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली....

फोटो - http://v.duta.us/31467wAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/jHFkZgAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬